Breaking News

पनवेल मनपा स्थायी समितीत विविध कामांना मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि. 1) मनपा भवनात झाली. या सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीच्या सभेस सभापती नगरसेवक संतोष शेट्टी, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष मोनिका महानवर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, प्रवीण पाटील, अजय बहिरा, मुकीद काझी, नरेश ठाकूर आदी सदस्य, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव व  इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महापालिका क्षेत्रातील खारघर नोडमधील प्लॉट क्र. 22, सेक्टर 5 येथील आयुक्त निवासस्थानाबाहेरील परिसर विकसित करणे व लॅण्डस्केपिंग करण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील नव्याने बांधण्यात आलेली 12 सार्वजनिक शौचालये पे अ‍ॅण्ड युज तत्त्वावर देण्यासही मंजुरी मिळाली.
 बैठकीदरम्यान परवाना विभागाकडील व्यवसाय परवाने, हॉटेल व्यवसाय परवाने, नवीन कारखाने व उद्योगधंदे यांचे सर्वेक्षण, नोंदणीकरण, नुतनीकरण, दुकानावरील जाहिराती (ग्लो सिंग बोर्ड) व परवानासंबंधीची अनुषंगिक कामे स्वारस्य अभिव्यक्ती (इओआय) पद्धतीने करुन नवीन व्यवसाय परवाने देणे व नुतनीकरण याबाबतदेखील चर्चा करण्यात आली असून, पुढील सभेत त्या विषयी निर्णय घेतला जाणार आहे, तसेच महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ब, प्रभाग क्र. 7 मधील रोडपाली स्मशानभूमी दुरुस्ती करणे, पालिका क्षेत्रातील जाहिरात धोरणेच्या कामी मे. अलवेज अ‍ॅडव्हर्टाझिंग एजन्सी वाशी-नवी मुंबई यांना मुदतवाढ देण्यास मान्यता मिळण्याबाबत  चर्चा करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील 1 भूस्तर साठवण टाकी व 18 जलकुंभांची दुरुस्ती करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply