Breaking News

फांदी अंगावर पडून दोन महिला जखमी

कर्जत : बातमीदार

माथेरान येथील एका झाडाची मोठी फांदी रविवारी (दि. 9) संध्याकाळी अचानक कोसळली. या फांदीखाली सापडून दोन महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर माथेरानच्या बी. जे. हॉस्पीटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बदलापूर येथे हलविण्यात आले आहे. 

घराचे रंग काम सुरु असल्यामुळे माथेरान पंचशीला बंगला येथील विशाखा विजय पार्टे (वय 32) या शिक्षिका रविवारी  सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अंगणात मुलांची शिकवणी घेत होत्या. त्यावेळी आपल्या मुलाला शिकवणीला सोडवण्यासाठी निकीता विजेंद्र देशमुख (वय 27) या तिथे आल्या होत्या. याचवेळी अचानकपणे घरासमोरील झाडाची मोठी फांदी कोसळली. या घटनेत विशाखा पार्टे व निकीता देशमुख या दोन्ही महिला जखमी झाल्या. पार्टे यांच्या हातापायाला आणि पाठीला तर  देशमुख यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. सुदैवाने शिकवणीला आलेली लहान मुले मात्र या दुर्घटनेतून बचावली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply