Breaking News

सुरगडावर माहिती फलक, दुर्गवीर प्रतिष्ठानची मोहीम

पाली : प्रतिनिधी

सुरगड किल्ल्यावर नुकतीच दुर्गवीर प्रतिष्ठानने माहिती फलक मोहीम राबविली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या मोहीमेत एक मोठा महिती दर्शक फलक आणि ठिकठिकाणी स्थळ दर्शक लावले आहेत. त्यामुळे येथे येणार्‍या दुर्गप्रेमींना सुरगडाची व इतिहासाची माहिती मिळणार आहे.

 साधारण पाच वर्ष टिकेल असा फलक बनवणे, त्याचा आकार ठरवणे, त्यातील माहिती – सूची बनविणे, फलक गडावर चढविणे म्हणजे एक दिव्यच असते. अवजड फलक व त्याचे खांब आणि बसविण्याचे साहित्य गडावर नेणे आणि लावणे खूप धोक्याचे व जिकरीचे काम आहे. मात्र ते प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तडीस नेले. व माहिती फलक मोहीम फत्ते केली. या मोहिमेत दुर्गवीरचे अर्जुन दळवी,  राज मेस्त्री, सचिन रेडेकर, अल्पेश पाटील, भूषण पवार, बाबुजी सुतार, जयेश भद्रिके आणि प्रशांत डिगंणकर व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.

गड संवर्धनचे काम नियमित सुरूच असते. अजूनही सुरगडावर अनेक कामे बाकी आहेत. त्यासाठी कोणाला सहकार्य करायचे असेल तर ुुु.र्वीीर्सींशशी.लेा । र्वीीर्सींशशीसारळश्र.लेा  9833458151, 8097519700  किंवा 8655823748 येथे संपर्क करण्याचे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

गडावर स्थळ दर्शक व महिती दर्शक फलक लागणे अत्यंत गरजेचे आहे. गडावर येणार्‍या गडप्रेमींना आडवाटेवर या फलकांच्या माध्यमातून किल्ला व इतिहासाची योग्य माहिती मिळते. गडावरील सर्व वास्तू पाहायला मिळतात. त्यामुळे अशा मोहिमा राबविणे फार गरजेचे आहे.

-संतोष हसुरकर,

संस्थापक अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply