Breaking News

शाळेसमोरील गटारे बंदिस्त करा

खोपोलीतील शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिकेची मागणी

खोपोली : प्रतिनिधी

येथील जनता विद्यालय शिशु मंदिर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर  असलेली गटारे उघडी असून, त्यात कचरा टाकला जात असल्यामुळे ही गटारे तुंबली आहेत. शाळा भरताना व सुटण्यादरम्यान विद्यार्थी घाईगडबड करीत असतात. या वेळी उघड्या गटरात पडल्यास गंंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उघडी गटारे बंदिस्त करावीत, अशी मागणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय, ज्युनियर कॉलेज व शिशु मंदिर शाळेत हजारो लहानमोठे विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळेसमोरील रस्ता अरूंद असल्याने  शाळा सुटण्यादरम्यान गर्दी होत असते. येथील गटारे उघडी असल्यामुळे विद्यार्थी गटारात पडू शकतात. सांडपाण्यामुळे ही सर्व गटारे तुंबली आहेत. त्यामुळे शाळेसमोरील गटारे लवकरात लवकर दुरूस्त करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply