Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 7 जानेवारी रोजी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या वेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा व आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास संपूर्ण देशातील तसेच परदेशातील पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड, उद्योजक जे.एम. म्हात्रे, संपादक विवेक मेहेत्रे आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून या सोहळ्यास नागिरकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply