Breaking News

अलिबाग तालुक्यातील सहा गावे कंटेन्मेंट झोन घोषित

रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधी

कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या अलिबाग तालुक्यातील सहा गावांना ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामध्ये सासवणे, नागाव, कुरूळ, नवेदर नवगांव, चौल व रेवदंडा या गावांचा समावेश आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषीत क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले असून त्या बाबतचे आदेश अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी जारी केले आहेत. त्यानुसार रेवदंडा मोठे बंदर येथून रेवदंडा गावात येण्याचा मार्ग बंद करण्यात आला असून अलिबागकडे जाण्यासाठी बायपास मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. चौलनाका येथे कडक पोलीस बदोबस्त ठेवण्यात आला असून, तेथून जा-ये करणार्‍या वाहनातील  चालक व प्रवाशांना ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत अँटीजेन टेस्ट करणे  बंधनकारक करण्यात आले आहेत. चौलनाका येथून सर्व वाहनांस रेवदंडा बायपास मार्गे सोडण्यास येत असून, रेवदंडा गावातून वाहने जाण्यास किंवा येण्यास बंदी करण्यात आली आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply