बंगळुरु ः वृत्तसंस्था : एका 26 वर्षीय विवाहित महिलेने नवरा, सासू-सासरे आणि दिरावर तिचे न्यूड फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवर्याला नपुंसकतेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले व त्यावर आपले न्यूड फोटो, व्हिडीओ अपलोड केले. सोशल मीडियावर त्यांनी आपण शरीरविक्री करणारी महिला असल्याचा प्रचार केला, असा आरोपही या महिलेने केला आहे. पीडित महिला बंगळुरु येथे राहणारी आहे. पीडित महिला आता आपल्या आई-वडिलांकडे राहत असून तिने शनिवारी पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली. आरोपींनी अपलोड केलेले फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पोलिसांनी सायबर क्राइम सेलच्या तज्ञांशी संपर्क साधला. अद्याप कोणालाही अटक केली नाही. आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्याचे आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे पोलिसांनी सांगितले. मला जेवणातून झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. मी गाढ झोपेत असताना मला विवस्त्र करून माझे फोटो काढले आणि न्यूड व्हिडीओ बनवले. माझे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यावर त्यांनी हे फोटो, व्हिडीओ अपलोड केले, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …