Breaking News

‘रमजानमध्ये कामाला जाता, मग मतदानात अडचण काय?’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : रमजानच्या महिन्यात मतदानाचे दिवस येत असल्याने यावर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने आक्षेप घेतला आहे. या काळात मतदान नको, अशी त्यांची मागणी आहे, मात्र या वादावरून एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेत तारखांवरून वाद निर्माण करणार्‍यांना सुनावले आहे. जर रमजानच्या महिन्यात लोक कामावर जाऊ शकतात, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. रमजान महिन्यातील मतदानाच्या तारखा असण्याबद्दल आपला काहीच अक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. तीन राज्य पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा या रमजान महिन्यात येतात. त्यामुळे मुस्लीम नेते आणि मौलवींनी निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला आहे. या तारखा बदलल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या तीन राज्यांत अल्पसंख्याकांची लोकसंख्या जास्त आहे. अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशी भाजपाची इच्छा आहे, असा पोरकट दावा काही मुस्लीम नेत्यांनी केला आहे.

मात्र निवडणुकांच्या तारखांवरून उगच वाद उकरून काढला जात असल्याचे ओवेसी म्हणाले. रमजानमधील निवडणुकांना आपला काहीही आक्षेप नसल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यावरून राजकारण करणार्‍यांना ओवेसी यांनी चांगलेच झापले आहे. निवडणुकांच्या तारखांवरून राजकारण करण्यांना एवढंच सांगेल की तुम्ही मुस्लीम समाचा ठेका घेऊ नका. निवडणुका येतील आणि जातील. मुस्लीम लोक रोजा पाळणार, नमाज पठण करणार आणि रमजानचा पवित्र महिना मोठ्या उत्साहात साजरा करणार, असे ओवेसींनी म्हटले आहे. तसेच रमजानचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत ओवेसींनी व्यक्त केले आहे.

निवडणूक आयोगाला 3 जूनच्या आधी निवडणुका घ्यायच्या असल्याने रमजानमध्येच निवडणुका घ्याव्या लागणार हे उघड आहे. रमजान आणि निवडणुकांच्या तारखांवरून तक्रार करणारे लोक रोजा असतो तेव्हा कमावर जात नाहीत का, असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला आहे. रमजानचे कारण देत निवडणुकांच्या तारखांवरून वाद निर्माण करणार्‍यांना मुस्लिमांची इतकीच काळजी असेल, तर ते उरलेल्या 11 महिन्यांत मुस्लीम समाजासाठी काय करतात ते सांगावे, असेही ओवेसी यांनी सुनावले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply