Breaking News

वनराई बंधारे ठरताहेत शेतकरी, पशुपक्ष्यांसाठी वरदान

मोहोपाडा : प्रतिनिधी

गाव पातळीवर बंधारा बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे आज काळाची गरज आहे. यामुळे वनराई बंधारे शेतकरी आणि पशुपक्ष्यांसाठी वरदान ठरत आहेत.                   

पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्त्रोत तळ गाठत असतात, मात्र काही ठिकाणी हेच पाणी आपण अडवू शकतो आणि हेच पाणी आपल्यासाठी मोठे वरदान ठरत असते. उन्हाळा आला की आपल्याला पाण्याचे महत्त्व समजते. कारण विहीर, तलाव, कूपनलिका, ओढे असे पाण्याचे असलेले स्त्रोत तळ गाठण्याची स्थिती निर्माण करीत असतात. पाणी हे जीवन आहे. कारण जल है तो हम है, अशा पद्धतीचे उच्चार सातत्याने करीत असतो. मात्र त्याचे आचरण कोणीही करीत नाही. तुरळक ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले जाते, मात्र प्रत्येकाने आपले नैतिक कर्तव्ये म्हणून पाणी अडविले पाहिजे. त्याचबरोबर यामुळे आपल्याला आर्थिक कमतरता भासत नाही, मात्र या सर्व बाबी पाणी अडवून साध्य होऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायत तसेच इतरांनी यासंदर्भात लक्ष घालून ही संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तालुक्यात असलेले बहुतेक ओढे आता तळ गाठण्याच्या तयारीत असून, लवकरच त्याबाबत उपाययोजना करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरून प्रवाह असलेल्या ठिकाणी एकावर एक रचून ठेवल्यास काही महिने पाणी या ठिकाणी जमा होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. प्रत्येकाने पाणी वापराबाबत दक्ष राहणेही गरजेचे आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply