Breaking News

रस्ता खोदल्याने गावांचा संपर्क तुटला; काळणवाडीतील ग्रामस्थ आक्रमक

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी परीसरातील चांभार्लीहून काळणवाडीकडे जाणारा रस्ता खोदल्याने दोन हजार घरांचा संपर्क तुटला असून शासनाच्या या प्रकाराविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर ठाण मांडून आपली नाराजी व्यक्त केली.

कालणवाडी, रिसवाडी व आसपासच्या सोसायट्यांकडे जाणारा रस्ताचे खोदकाम होणार असा असे हरेष उतेकर यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे कळविताच ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश खारकर यांनी घटनास्थळी भेट दिली. परंतू दुसर्‍याच दिवशी  काळणाचीवाडीकडे जाणारा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदल्याने अनेक गावांचा व सोसायट्यांचा संपर्क तुटला. तसेच या परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या फुटल्याने येथील रहिवाश्यांना पाण्यावाचून राहावे लागले.

हा रस्ता शाळकरी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी वापरत असल्याने विद्यार्थ्यांनीही शाळेला दांडी मारली. तर काळणवाडीकडे जाणारा हा एकमेव रस्ता असल्याने बाहेर गावी जाताना परिसरातील अंध-अपंगानाही नाहक त्रास सहन करावा लागला. ज्यांनी खोदला त्यांनी या जागेवर आपला मालकी हक्क सांगितला आहे.परंतु गेल्या चाळीसवर्षांपेक्षा जास्त कालावधीतील हा रस्ता असून या रस्त्यांची वहिवाट म्हणून नोंद असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने हरेश उतेकर यांनी सांगितले. या वेळी उपसरपंच राकेश खारकर आणि माजी सरपंच सचिन तांडेल यांनी प्रयत्न केल्याचे समजते. काळणवाडी रस्ता खोदकाम प्रकरण चिघळल्याने खालापूर तहसिलदार कार्यालयात आमदार महेश बालदी व तहसिलदार इरेश चप्पलवार यांच्यात चर्चा झाली. यात आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, पिढ्यांपिढ्या आलेला हा रस्ता आहे. आणि या रस्त्याचे खोदकामे करणे चुकीचे आहे. कारण रस्त्याच्यापलीकडे दोन हजार लोकांची वस्ती आहे. आणि आता जर कोणी या रस्त्यावर प्लॉटचा ताबा-कब्जा दाखवत असेल तर ते चुकीचे आहे. चर्चेअंती तात्पुरता रस्ता खुला करण्यात यावा असे ठरले. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे विनोद साबले, वासांबेच्या सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच सचिन तांडेल, माजी सरपंच शशिकांत मुकादम, माजी सरपंच संदिप मुंढे, आकाश जुईकर, चौक मंडळ अधिकारी नितिन परदेशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply