Breaking News

छत्रपती संभाजी महाराज जयंती घराघरात साधेपणाने साजरी

उरण : वार्ताहर – छत्रपती संभाजी महाराज यांची चिरनेर येथे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी जयंती साजरी होत असते. परंतू कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या वर्षी ही जयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आयोजक छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष कडू यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करुन केलेल्या आवाहनानूसार शिवभक्तांनी आपापल्या घरातच जयंती साजरी केली.

त्यानुसार गुरुवारी (दि. 14) घरोघरी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले, त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुशील म्हात्रे यांनी पुरोहितामार्फत विधीवत घरातच पूजन केले. घरात पुरोहिता सहीत फक्त चार व्यक्ती उपस्थित होत्या. तर संस्थापक अध्यक्ष सुभाष कडू यांनी आपल्या घरात स्वत: पुरोहिताची जबाबदारी पार पाडली व मुलांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले. तसेच इतरांनी फक्त प्रतिमेचे पूजन करुन व छत्रपती संभाजी महाराजांची आरती बोलून वंदन केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply