पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील गव्हाण ग्रुपग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे शनिवारी (दि. 15) आयोजन करण्यात आल होते. हा समारंभ शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी, सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
गव्हाण येथे आयोजित या हळदी-कुंकू समारंभात अॅड. दीपाली बांद्रे यांचे महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान झाले, तसेच महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व खेळ घेण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेविका दर्शना भोईर, सुशिला घरत, माजी नगरसेविका वर्षा नाईक, शांताबाई अरुणशेठ भगत, पंचायत समिती विस्तार अधिकारी पूजा चांगोले, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, सदस्य योगिता भगत, शिल्पा कडू, उषा देशमुख, सुनीता घरत, कामिनी कोळी, गिरीजा कातकरी, संध्या घरत, बानूबाई भगत, मनीषा ठाकूर, अरुणा कोळी, दमयंती कोळी, वैशाली देशमुख, सदस्य विजय घरत, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील, अरुणा देशमुख, संध्या मुंबईकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Check Also
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग, सुविधांचे लोकार्पण
पनवेल ः वार्ताहरडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून चांगली सेवा मिळत असल्याने …