Breaking News

भारताविरुद्ध बोल्टचे पुनरागमन

न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर; जेमिन्सनला संधी, सॅन्टनरला वगळले

वेलिंग्टन : वृत्तसंस्था
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-20 आणि वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. भारताने कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. आता न्यूझीलंडनेही कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यजमानांच्या संघात वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टने पुनरागमन केले आहे, तसेच न्यूझीलंडने वेगवान गोलंदाज कायल जेमिन्सनला संधी दिली असून, फिरकीपटू मिशेल सॅन्टनरला मात्र संघातून वगळण्यात आले आहे.
ट्वेन्टी-20 मालिकेत भारताने पाचही सामने जिंकून न्यूझिलंडला ‘व्हाईटवॉश’ दिला, तर त्यानंतर झालेल्या वन डे मालिकेतील सर्वच्या सर्व म्हणजे तीन सामने जिंकून टी-20 ‘व्हाईटवॉश’ची परतफेड केली. आता उभय देशांमध्ये दोन कसोटींची मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये कोणता संघ बाजी मारतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातील सराव सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील हाराकिरीनंतर टीम इंडियाने गोलंदाजांच्या जोरावर सामन्यात कमबॅक केले. पहिल्या डावातील 28 धावांच्या आघाडीत टीम इंडियाने तिसर्‍या दिवशी 4 बाद 252 धावा करताना सामना अनिर्णित राखला.
भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.
न्यूझीलंडचा संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, रॉस टेलर, कॉलिन डे ग्रँडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, नील वॅगनर, बीजे वॉलटिंग, नील वॅग्नर.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply