मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगूल अखेरीस वाजले असून, गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच मुंबईने विक्रमी कामगिरी करीत चेन्नईला मागे टाकले आहे.
आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची मुंबई इंडियन्सची ही सातवी वेळ ठरणार आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांनी प्रत्येकी सहा वेळा आयपीएलचा पहिला सामना खेळला आहे. 29 मार्चला मुंबईचा संघ चेन्नई आणि कोलकात्याला मागे टाकेल.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …