अलिबाग : प्रतिनिधी
येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीला लग्नाच्या भूलथापा देऊन विवाहित तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी कन्हैया सिंग याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी अलिबागमधील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या तिसर्या वर्षात शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर 2017पासून आरोपीने या तरुणीशी मैत्री करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्न करेन, असे सांगून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
कन्हैया सिंग हा विवाहित असल्याचे समजल्याने पीडित तरुणीने याबाबत अलिबाग पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार अलिबाग पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …