विनोदी कलाकारांनी केली फुल टू धम्माल;
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय, झेंडा सामाजिक संस्था, तसेच टीआयपीएल यांच्या वतीने चला हवा आली कामोठ्यात या मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 16) करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
चला हवा आली कामोठ्यात हा तीन तासांचा विनोदी कार्यक्रम खांदेश्वर सर्कस ग्राऊंडवर रंगला. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, उद्योजक राजू गुप्ते, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, रविशेठ पाटील, हॅपी सिंग, आयोजक जय पावणेकर, जयप्रकाश पावणेकर, सुमित गोवारी, विशाल पावणेकर, अरुण पावणेकर, तुषार हिरवे आदी उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाचा सूत्रधार निलेश साबळे, कलाकार भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे आदींनी आपली कला सादर करून उपस्थितांना हसविले.