पोलादपूर : प्रतिनिधी
राज्य शासन, रायगड जिल्हा परिषद आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी प्रसिद्ध वक्ते नितीन बानकुळे-पाटील यांचे व्याख्यान झाले. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाधीस्थळी नममस्तक होत अभिवादन केले.
नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा समाधी नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळा संपल्यानंतर यंदाचा नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार दिग्दर्शक ओम राऊत यांना प्रदान करण्यात आला.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …