Breaking News

शेतकर्यांवरील अन्याय दूर करणार -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सातबार्‍यावरील चुकीच्या नोंदी काढून टाकण्याच्या महसूल विभागाला सूचना

महाड : प्रतिनिधी

बिरवाडी, काळीज, आमदशेत परिसरातील शेतजमिनींवर औद्योगिक वसाहतीसाठी अशी पेन्सिलने नोंद करण्यात आली आहे, प्रत्यक्षात तिचा वापर केला गेला नाही व शेतकर्‍यांना मोबदलाही दिला नाही. हा अन्याय असून, तो दूर करण्याचे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संबंधीत शेतकर्‍यांना दिले. बिरवाडी परिसरातील बाधित शेतकर्‍यांनी सोमवारी महाड प्रांत कार्यालयामध्ये आमदार प्रविण दरेकर यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. आणि त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. 1980 मध्ये महाड औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करताना बिरवाडी परिसरातील जमिनींवर औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक अशी नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आजतागायत या जमिनींचे संपादन करण्यात आलेले नाही किंवा कोणता मोबदलाही या शेतकर्‍यांना देण्यात आलेला नाही. मात्र सातबारा उतार्‍यावर असलेल्या पेन्सिल नोंदीमुळे शेतकर्‍यांना या जमिनीची खरेदी, विक्री, बँक, तारण, बिनशेती, घर बांधणीसाठी वापर करता येत नाही. त्यामुळे सातबारा उतार्‍यावरील नोंदी काढून टाकाव्यात. तसेच बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाण क्षेत्र वाढवून देण्यात यावे, भूमीहीन झालेल्या शेतकर्‍यांना रेाजगार उपलब्ध करुन देण्यात द्यावा, बिरवाडीतील सांडपाण्याची कायम स्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, एमआयडीसी महाड ऐवजी एमआयडीसी बिरवाडी असे नामकरण करण्यात यावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि तहसिलदार पवार यांच्याकडून दरेकर यांनी सातबारा उतार्‍यावरील पेन्शीलनोंदी  संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर दरेकर यांनी, 30 वर्षापासून झालेला अन्याय दूर करण्याचे आश्वासन बाधित शेतकर्‍यांना दिले. तसेच बिरवाडी भागात कॅम्प लावून सातबारा उतार्‍यावरील चुकीच्या नोंदी कमी करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना महसुल विभागाला केल्या. भाजपचे बिपीन महामुणकर, राजेय भोसले, जयवंंत दळवी तसेच बाधीत शेतकरी विनोद पारेख, कृष्णा घाग, मधुकर शेडगे, प्रमोद पारेख, बाबू म्हामुणकर, इक्बाल माटवणकर, अशोक कदम, यशवंत म्हामुणकर, मधुकर भोसले यांच्यासह बिरवाडी परिसरातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply