Breaking News

वृक्ष लागवड ईश्वरी काम; चौकशीस तयार -मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर वृक्ष लागवड हे ईश्वरी काम आहे, असे सांगत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे.
फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. राज्यातील सरकार बदलल्यानंतर विद्यमान वनमंत्री संजय राठोड वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नेमके किती वृक्ष लावण्यात आले. ते नेमके कोणते होते आणि त्यातील किती जगले? या सार्‍याची चौकशी केली जाणार आहे.
मुनगंटीवार यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजप सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीच्या प्रयत्नांची लिम्का बुकनेही नोंद घेतली होती. सरकारचे एकूण 32 विभाग या अभियानात होते. त्या सर्वांची चौकशी नव्या सरकारने करावी.
निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी व्हावी आणि गरज वाटल्यास श्वेतपत्रिकाही काढावी,’ असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply