Breaking News

जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या रविवारच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर उरणमधील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच उरण चारफाटा, राजपाल नाका, वैष्णवी हॉटेल कॉर्नर, देऊळवाडी, गणपती चौक, चिरनेर परिसर, जासई परिसर आदी ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भाजपच्या माजी नगरसेविका नीता माळी यांची पोलिसांसाठी चहा, बिस्कीटची व्यवस्था

पनवेल : भाजपच्या माजी नगरसेविका नीता माळी यांनी गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांसाठी आपल्या सहकार्‍यांच्या वतीने चहा व बिस्कीटची व्यवस्था केली होती. सोमवारीदेखील त्यांनी शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावण्यासाठी आलेल्या तसेच बाहेरगावी राहणार्‍या पोलीस बांधवांसाठी चहा व बिस्कीटचे वाटप केले. या वेळी महेश भालेकर, मंदार खुरूद आणि ज्योती स्वामी यांनी सहकार्य केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply