Breaking News

भाजप खारघर मंडल कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाची कार्यकारिणी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केली आहे. भाजपच्या संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये बुथ अध्यक्षांपासून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक द़ृष्टीने रायगडचे दोन जिल्हे झाल्यावर खारघरला मंडलाचा दर्जा देण्यात आला असून मंडल अध्यक्ष म्हणून ब्रिजेश पटेल यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने ब्रिजेश पटेल यांनी त्यांच्या कार्यकारिणीची

घोषणा केली.

त्यामध्ये  मंडल उपाध्यक्षपदी निर्दोष केणी, रमेश खड़कर, संजय घरत, निशा सिंग, बिना गोगरी, तर मंडल सरचिटणीस म्हणून कीर्ती नवघरे व दीपक शिंदे, मंडल चिटणीसपदी साजिद पटेल, गुरुनाथ ठाकूर, सोमनाथ म्हात्रे, अनिता जाधव, मीरा घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला मोर्चा अध्यक्षपदी वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्षपदी विनोद घरत, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुरेश ठाकूर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी अनिल साबणे, उत्तर भारतीय प्रकोष्ठ संयोजकपदी विनोद ठाकूर, दक्षिण भारतीय सेल संयोजकपदी रवींद्रन नायर, व्यापारी सेल संयोजकपदी अंबालाल पटेल, भटके-विमुक्त आघाडी संयोजकपदी विलास राठोड, वैद्यकीय सेल संयोजकपदी किरण पाटील, माजी सैनिक सेल संयोजकपदी गजेसिंग शेरॉन, ट्रान्सपोर्ट सेल संयोजकपदी नरेंद्र रेड्डी, सांस्कृतिक सेल संयोजकपदी उमेश चौधरी, सहकार सेल संयोजकपदी रवींद्र श्रीवास्तव, विधी सेल संयोजकपदी अ‍ॅड. राजेंद्र अग्रवाल, तर प्रभाग 4 अध्यक्षपदी वासुदेव पाटील, प्रभाग 5 अध्यक्षपदी रवींद्र काकडे व प्रभाग 6 अध्यक्षपदी विलास निकम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकारी पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करतील, असा विश्वास मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply