Breaking News

रायगडात 20 कोरोना बळी; 502 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 27) 20 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची व 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 519 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 329, अलिबाग 57, पेण 32, कर्जत व माणगाव प्रत्येकी 18, रोहा 11, खालापूर नऊ, महाड आठ, पोलादपूर सात, तळा पाच, उरण चार, श्रीवर्धन दोन, तर मुरूड व सुधागडातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मयत रुग्ण पनवेल तालुक्यात 11, अलिबाग तीन, उरण दोन, कर्जत, पेण, माणगाव व सुधागड येथे प्रत्येकी एक असे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 54,544 व मृतांची संख्या 1220 झाली आहे. 39,752 जण बरे झाल्याने 4572 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply