सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी
कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. रिफायनरीला समर्थन करणार्या विभागप्रमुखावर शिवसेनेने कारवाई केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील तब्बल 22 शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकार्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. सागवे आणि इतर गावांतील शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसेनेच्या 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकार्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाला संघटनेच्या नियमानुसार दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेना सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांची पक्षाने तडकाफडकी विभागप्रमुखपदावरुन जिल्हाप्रमुखपदी उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवसेनेने राजा काजवे यांच्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ विभागातील शाखाप्रमुखांसह पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.