Breaking News

शासकीय कार्यालयांना जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट

श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर सुदुंबरे संस्थेचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील जय संताजी तेली समाज मंडळ, श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर सुदुंबरे संस्था, महा. प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कार्यालयांना संताजी महाराज जगनाडे यांची आकर्षक प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत पनवेलचे पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ व निवडणूक नायब तहसीलदार नालंद गांगुर्डे यांना शासनाने जाहीर केलेल्या अध्यादेशाची शासन निर्णयाची प्रत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांचे पत्र व संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा देण्यात आली. शासनाने जारी केलेल्या आदेशामध्ये तेली समाजाचे आराध्यदैवत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी (दि. 8) सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले. या वेळी सचिव सतीश भालचंद्र वैरागी, कार्याध्यक्ष गणेश मुरलीधर धोत्रे, उपाध्यक्ष सुनील खळदे, उपाध्यक्ष गजानन शेलार, खजिनदार तुकाराम किर्वे, तालुका अध्यक्ष रमेश जगनाडे, उपाध्यक्ष अनिल खोंड, युवा अध्यक्ष प्रशांत शेडगे, ज्येष्ठ उद्योगपती दिलीप डिंगोरकर, गणेश खोंड, योगेश जगनाडे आदी तेली बांधव उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply