Breaking News

प्रज्ञान ओझाची 33व्या वर्षी निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू प्रज्ञान ओझा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ओझाने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणीच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्वत: ओझाने सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

33 वर्षीय ओझाने ट्विटरवर दोन पानांचे पत्र शेअर केले आहे. ज्यात त्याने माजी कर्णधारांचे आणि सहकार्‍यांचे आभार मानले आहेत. माझ्या आयुष्यातील आता पुढील टप्प्याचा प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रेम आणि समर्थन देणारा प्रत्येक व्यक्ती मला नेहमी लक्षात राहील आणि मला ऊर्जा देत राहील, असे त्याने म्हटले आहे.

ओझाने 2008मध्ये भारतीय वन डे संघात पदार्पण केले होते. त्यानंतर 2013 मध्ये त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ओझाने भारतीय संघाकडून 24 कसोटी, 18 वन डे आणि सहा टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 113 विकेट्स घेतल्या आहेत. त्यात एक वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. वन डेत ओझाने 21, तर टी-20मध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीचा विचार केल्यास कसोटीत 89, वन डेत 46, तर टी-20मध्ये त्याने 10 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वाटल्याने त्याने निवृत्ती घेतली. भविष्यात ओझा प्रशिक्षक आणि समालोचकाच्या भूमिकेत दिसू शकेल.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply