Breaking News

सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या

अकोला : प्रतिनिधी

महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याने आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. प्रणवने अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. शुक्रवारी (दि. 21) सकाळी साडेनऊच्या सुमारस प्रणव रूममधून बाहेर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला, पण तो आतून बंद होता. अनेक वेळा आवाज देऊनदेखील तो दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रणवने गळफास घेतल्याचे आढळले.

प्रणव कालपर्यंत ठीक होता. त्याच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात नसल्याचे मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी सांगितले. वयाच्या 22व्या वर्षी प्रणवने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचा सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. प्रणवच्या आत्महत्येमुळे अकोला आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply