खोपोली : प्रतिनिधी : इतिहासाशिवाय आपण पुढे जावू शकत नसून उद्याच्या भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महारांच्या शौर्याचा इतिहास व पराक्रमाची साक्ष ठेवण्यासाठी छत्रपतींंचे स्मारके व जयंती साजरी करावा असे अवाहन करीत इतिहास उगाळत बसू नका असे वक्तव्य करणार्यांचा खरपूस समाचार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आम प्रविण दरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ स्मारक उद्घाटनाच्या वेळी बोलताना घेतला आहे.
खालापूर तालुक्यातील माणकीवली गावात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ स्मारक जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधत विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, राजेेंंद्र यरूणक, शिसवेना नेते नवीन घाटवळ, मनसेचे जिल्हा नेते जे. पी. पाटील आदी उपस्थित होते.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उद्घाटनाच्यावेळी माणकिवली ग्रामस्थांंनी छत्रपती महाराजांचा देखणा व सुंदर अश्वरूढ स्मारक उभारत परिसराचे सुभोभीकरण केल्याबद्दल कौतुक केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात शेतकर्यांच्या भाजीच्या देठाला ठेस पोहचणार नाही याची काळजी घेत असत तसेच छत्रपतींच्या राज्यातील आचार विचाराच्या रयतेच्या राज्याची संकल्पनेची विसंग महाविकास आघाडीचा सरकारचा पडला तर विरोधी पक्ष नेता म्हणून धारेवर धरणार असल्याचा इशारा दिला आहे.