कामोठे : रामप्रहर वृत्त
रविशेठ जोशी सोशल फाऊंडेशन आणि मॅजिक टच इव्हेंट्स यांच्या वतीने महाराष्ट्राचा मिसळ महोत्सव कामोठे येथे पोलीस ठाण्यासमोरील मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) झाले.
महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, विकास घरत, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, नितीन पाटील, नगरसेविका संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, शीला भगत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, आयोजक रविशेठ जोशी आदी उपस्थित होते.
या महोत्सवात महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रकारची मिसळ, तसेच मिसळव्यतिरिक्त प्रसिद्ध असलेले अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या मिसळची चव चाखता येत असल्याने खवय्ये या महोत्सवास गर्दी करीत आहेत. 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार्या या महोत्सवाला खवय्यांनी आवर्जून भेट देऊन मिसळचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन रविशेठ जोशी सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …