Breaking News

नागोठणे विभागात पुन्हा विकासाची गंगा वाहणार

सचिन मोदी यांचा विश्वास

नागोठणे : प्रतिनिधी : मंत्रिपदाच्या काळात नागोठणे विभागात विकासाची गंगा अविरतपणे वाहत ठेवणार्‍या रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या रूपाने नागोठण्यात पुन्हा एकदा विकासाची गंगा वाहायला प्रारंभ होणारच, असा विश्वास भाजपचे युवा नेते सचिन मोदी यांनी व्यक्त केला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगड दौर्‍यात पेण येथे भाजपचे नेते, माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांजवळ संवाद साधला होता. या वेळी येथील युवा नेते सचिन मोदी यांनी नागोठणे शहरासह मुरावाडी, तसेच विभागातील इतर गावांतील प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदनाद्वारे पालकमंत्री चव्हाण आणि रवीशेठ पाटील यांचे लक्ष वेधले होते. रवीशेठना नागोठणे विभाग पूर्णपणे परिचित असल्याने निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांना माहिती दिली असून निवडणुकीनंतर सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे दोन्ही नेत्यांनी आश्वासन दिले असल्याचे मोदी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना स्पष्ट केले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री रवीशेठ पाटील आणि आमचे नेते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून नागोठण्याच्या विकासाला पुन्हा एकदा गती मिळणारच, असा पुनरुच्चार मोदी यांनी या वेळी केला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply