Breaking News

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुरूड पोलीस ठाण्यास 20 बॅरिकेटस् प्रदान

मुरूड : प्रतिनिधी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी (दि. 12) मुरूड पोलीस ठाण्यास 20 बॅरिकेटस प्रदान करण्यात आले. सहाय्यक निरिक्षक किशोर साळे, हवालदार अनिल अहिरे, जी. डी. लवटे, एस. एस. पाटील, एल. व्ही. कडू, सुरेश वाघमारे यांनी या बॅरिकेट्सचा स्वीकार केला. या वेळी मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून मिळालेल्या बॅरिकेट्सचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होणार आहे. वाहतूक नियमन, मतमोजणी, धरणे, आंदोलन, जमावबंदी प्रसंगी, तसेच शिघ्रे, उसरोली चेकपोष्ट आदी ठिकाणी हे बॅरिकेट्स उपयुक्त ठरतील, असे सांगून सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर साळे यांनी या वेळी धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार मानले.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply