नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली. भारतानं ग्रीको रोमन प्रकारात एक सुवर्ण आणि चार कांस्यपदक जिंकली. महिला गटात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदके, तर पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात एक सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकली.
स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला जितेंदरने 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने कझाकिस्तानच्या कैसानोव्ह डॅनियारवर 3-1 असा विजय मिळवला. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि 2019च्या आशियाई व जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या राहुल आवारेने 61 किलो वजनी गटात अटीतटीच्या लढतीत इराणच्या डॅस्टन माजीद आल्मासचे आव्हान 5-2 असे परतवून लावले आणि कांस्यपदक जिंकले.
अखेरच्या दिवशी दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटात इराकच्या अल ओबैदी इसा अब्दुलसलाम अब्दुलवाहाबवर 10-0 असा विजय मिळवून कांस्यपदक नावावर केले.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …