पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप व जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ मोठा खांदा यांच्या माध्यामतून मोठा खांदा गावातील नागरीकांना मोफत शिर्डी दर्शन घडवण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजपचे पनवले शहर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यामतून राबवण्यात येत असून ही या शिर्डी दर्शन उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे पनवेल रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आला.
या उपक्रमामध्ये मोठा खांदा गावातील 100 नागरीकांना शिर्डी दर्शन घडवण्यात येणार आहे. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, अल्का भगत, आयोजक सतीश पाटील, महेंद्र कावळे, अध्यक्ष परेश पाटील, खजिनदार अमोल भगत, गुरुनाथ धुंदरेकर, सुरेश कावळे, धीरज पाटील, नितीन पाटील, नितेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …
RamPrahar – The Panvel Daily Paper