Breaking News

पनवेल भाजपची सामाजिक बांधिलकी

पंचशील नगरमधील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भारतीय जनता पक्षातर्फे महापालिका हद्दीतील गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी (दि. 2) नवीन पनवेलमधील पंचशील नगर येथील गरीब, गरजूंना मदत करण्यात आली.
आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमीच मदतीचा हात पुढे करीत असतात. कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटकालीन परिस्थितीतही त्यांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर आणि भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने धान्य, साखर, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे. त्या अंतर्गत गुरुवारी नवीन पनवेलमधील पंचशील नगरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
बेघर, निराधार व स्थलांतरीत मजूर तसेच कामगारांना सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे काम मिळत नसल्याने त्यांचे हाल होऊ नये तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर भाजपच्या माध्यमातून करीत आहेत. याबद्दल गोरगरीब, गरजवंत नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मदत देतवेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते जगदिश घरत, जितेंद्र वाघमारे, पप्पू साळवे, रत्नाकर नेमाडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकूर पिता-पुत्रांचा पुढाकार
महापूर असो किंवा अन्य कोणतीही आपत्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक भावनेतून मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. लोकांवरील बिकट प्रसंग म्हणजेच आपल्यावरील प्रसंग आहे, असे मानून ते काम करतात. सध्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पनवेल क्षेत्रात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर जातीने लक्ष देत आहेत.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply