Breaking News

छत्रपती शिवराय आपल्या रक्तात असले पाहिजेत -डॉ. सागर देशपांडे

कर्जत : प्रतिनिधी

शिवजयंती आहे, त्या दिवशी फेटे बांधणे, ढोल ताशा, डीजेच्या संगीतावर मिरवणूका काढणे इतक्यावरच न थांबता शिवाजी महाराजांचा एक गुण जरी अंगिकारला तरी जीवनाचे सार्थक होईल. शिवराय आपल्या रक्तात असले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. सागर देशपांडे यांनी येथे केले.

कोंकण ज्ञानपीठाच्या कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष समारंभात डॉ. देशपांडे व्याख्यान देत होते. 2047पर्यंत भारत जगाचा विश्वगुरु होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थी प्रतिनिधी अतिश पाटील याने प्रास्ताविकात समारंभाची रूपरेषा सांगितली. संस्थेचे खजिनदार झुलकरनैन डाभिया यांच्या हस्ते  डॉ. देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या रंगावली स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्याना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. भावेश खाडे पोवाडा सादर केला. प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, उपप्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव प्रदीप श्रुंगारपुरे यांनी आभार मानले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply