मुरूड : प्रतिनिधी
येथील जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील 32 निमंत्रित संघांतंर्गत भव्य कबड्डी स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत वाळवटीचा शिवलिंग संघाने जय श्रीराम चषक पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन मुरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास नगराध्यक्षा स्नेहा पाटील, संस्थेचे चेअरमन अॅड. मोहन तांबडकर, उपाध्यक्ष दिलीप जोशी, स्पर्धा प्रमुख बाळकृष्ण कासार, पंचक्रोशी कबड्डी असोसिएशनचे मोहन पाटील, सचिन पाटील, नितीन वारगे, नंदकुमार ठाकूर, संदीप कमाने आदी उपस्थित होते.
निशुल्क असलेल्या या स्पर्धेत रंगतदार सामने झाले. अखेर वाळवटी येथील शिवलिंग संघाने प्रथम, खारीकवाड्याच्या वादळ संघाने द्वितीय, खारअंबोलीच्या हनुमान संघाने तृतीय, तर उंडरगावच्या जय हनुमान संघाने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू मयूर घरत (वाळवटी) उत्कृष्ट चढाईपटू ओमकार मेस्री (खारीकवाडा) आणि उत्कृष्ट पकडपटू म्हणून ऋषिकेश तेलगे (वाळवटी) यांची निवड करण्यात आली. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक, तर उल्लेखनीय कामगिरी करणार्या खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे ज्येष्ठ संचालक पांडुरंग निरकर यांनी सर्वांचे आभार मानले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …