Breaking News

विजेचा खांब अंगावर पडून चौघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

खोपोली रेल्वेस्टेशन परिसरातील श्री भैरवनाथ मंदिराजवळ बुधवारी (दि. 26) दुपारी नगरपालिकेचा विजेचा खांब अंगावर पडल्याने चार पादचारी जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शहरातील श्री भैरवनाथ मंदिराजवळील रस्त्यावर असलेला  नगरपालिकेचा विजेचा खांब बुधवारी दुपारी अचानक कोसळला. या घटनेत चार पादचारी जखमी झाले. याचे वृत्त समजताच सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड, अविनाश तावडे, विशाल गायकवाड, मनोज माने, जगन्नाथ ओव्हाळ, गुरुनाथ साठेलकर, प्रवीण क्षीरसागर, रवी रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी किरकोळ जखमी झालेल्या तिघांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या शंकर कांबळे (रा. सोमजाईवाडी, खोपोली) यांना पुढील उपचारासाठी डॉ. दळवी यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply