उलवे नोड : रामप्रहर वृत्त
सिडकोतर्फे उलवे नोड सेक्टर 21मध्ये नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन बुधवारी (दि. 13) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. खाजगी खर्चिक उपचारांच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य केंद्रांच्या उभारणीद्वारे सर्वसामान्यांना माफक दरात दर्जेदार उपचारांची हमी मिळेल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमास वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप वाहतूक सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, उलवे नोड-2चे अध्यक्ष विजय घरत, उलवे नोड-1चे अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष शैलेश भगत, नंदू ठाकूर, गोपी भोईर, चिंतामण गोंधळी, रवींद्र शिंदे, अनू दुबे, प्रिया शिंदे, सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बावीस्कर, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, नंदकुमार परब, संदेश पोखरणकर, प्रसाद जामवडेकर, गौतम म्हस्के, रंजन कोलथरकर, श्री. बोकाडे, श्री. ठकार व श्री. रामोडे उपस्थित होते. या केंद्राच्या उभारणीकरिता सुमारे 70 लाख रुपये इतका खर्च आला आहे.