भाईंदर : मीरा-भाईंदरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मात दिली आहे. भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांनी शिवसेनेचे अनंत शिर्के यांचा पराभव केला. उपमहापौरपदी भाजपचेच हसमुख गेहलोत यांनी विजय मिळवला. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही लढाई झाली. 95 सदस्यीय पालिकेत 61 नगरसेवकांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत असून, शिवसेनेचे 22, तर काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत. काँग्रेसने या निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली. भाजपच्या मोरस रॉड्रिक्स, अश्विन कसोदरिया, वैशाली रकवी, परशुराम म्हात्रे व गीता जैन या पाच नगरसेवकांनीही शिवसेनेच्या पारड्यात आपली मते टाकली. तरीही शिवसेनेचे बळ तोकडेच पडले. हसनाळे यांना 55, तर शिर्के यांना 36 मते मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपचा प्रत्येकी एक सदस्य अनुपस्थित होता.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …