Breaking News

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या 92व्या जयंतीचे औचित्य साधून स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर महाविद्यालय (सीकेटी) राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि एमजीएम हॉस्पिटल रक्तपेढी कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 28) सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात होणार्‍या या शिबिराचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक व सभागृह नेते परेश ठाकूर, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संजय भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply