ब्यूनोस आयर्स : वृत्तसंस्था स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर प्रथमच अर्जेंटिनाच्या संघात सहभागी झाला. मेस्सी सुमारे आठ महिने देशाच्या संघाबाहेर होता. प्रशिक्षक लियोनेल स्कालोनी यांनी मेस्सीला व्हेनेझुएला व मोरोक्को या संघाविरुद्ध होणार्या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी संघात स्थान दिले आहे. पाच वेळा सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आलेल्या 31 वर्षीय मेस्सीने जून महिन्यात विश्वचषक सामन्यात अर्जेंटिनाकडून शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यात फ्रान्सकडून पराभव झाल्यानंतर तो देशाच्या संघात सहभागी नव्हता. मेस्सीबरोबरच एंजेल डी मारिया या खेळाडूलाही खूप कालावधीनंतर संघात स्थान मिळाले आहे.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …