पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप पुरस्कृत वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेच्या भाताण येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 1) झाले. या वेळी त्यांनी रिक्षाचालकांना ग्राहकांना चांगली वागणूक दिल्यास आपला व्यवसायाची वृद्धी होईल, असे प्रतिपादन केले. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेच्या भाताण येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा रिक्षा स्टँडचच्या नामफलकाचे अनावरण आणि श्री सत्यनारायण पुजेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या सोहळ्याला तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे दर्शन घेतले तसेच रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण केले.
या वेळी वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच ताणाजी पाटील, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक ठाकूर, अनिल काठावले, किरण मुकादम, दीपक दुर्गे, अनिल भोईर, स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर मुकादम, उपाध्यक्ष हरिश्चंद्र ठाकूर, नाका प्रमुख जनार्दन टावरे, उप नाका प्रमुख सदाशिव भोईर, खजिनदार संतोष पाटील, गणेश भोईर, सल्लागार किरण मुकादम, गणेश भोईर, सदस्य मदन जुमारे, शंकर भोईर, हेमंत मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …