Breaking News

म्हसळ्यात मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा

म्हसळा : प्रतिनिधी

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात गुरूवारी (दि. 27) ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यीक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शाळा नं.1च्या विद्याथ्यार्ंना 50 पुस्तकांचा संच देऊन साखळी वाचनालयाचे सदस्य करून घेतले. यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मशाळे यांनी मराठी भाषेचा व मराठी साहित्याचा आढावा घेतला.

बालवयातील विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार चांगल्या तर्‍हेने बिंबवता येतात, याच वयात गोष्टी स्वरुपाची पुस्तक हाताळण्याची सवय लागते. लहान वयांत मुलाना वाचनालयात जाण्यास गैरसोयीचे होते, म्हणून म्हसळा सार्वजनीक वाचनालय राबवित असलेला ‘ग्रंथ बालवाचकांच्या दारी‘ हा प्रकल्प स्तूत्य आहे, असे मत  प्रा. मशाळे यांनी यावेळी व्यक्त केले.

  पालकांकडून ऐकलेल्या गोष्टी बालमनावर दीर्घकाळ संस्कारीत होतात म्हणून प्रत्येक मुलाने आपल्या आई-वडील, आजी- आजोबा यांच्याकडे रोज रात्री झोपण्यापूर्वी गोष्टी सांगण्याचा आग्रह धरला पाहिजे तरच जाणत्या वयात मुले ग्रंथालयाकडे वळतील, असे माशाळे यांनी स्पष्ट केले.

म्हसळा शहरातील शाळा नं.1च्या सरस्वती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला तालुका गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे, वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, मुख्याध्यापिका शुभदा दातार,  सदस्य अब्दुल र. मेमन, खारगाव (खुर्द) शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत सुतार, रेखा धारीया, दिपक पाटील, सलाम कौचाली, राजेंद्र मालुसरे, सुमित्रा खेडेकर, वंदना खोत, कल्पना पाटील, डी. डी. अनाप, व्ही.जी. सोनावणे, आर. एस. मांडवडे, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, धनश्री नाक्ती आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply