Breaking News

भाजप पनवेल तालुका मंडलच्या बैठकीत विविध विषयांवर विचारविनिमय

पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान

कै. संजय भोपी यांना श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या पनवेल तालुका (ग्रामीण) मंडलची मासिक बैठक गुरुवारी (दि. 18) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अनेक विषयांवर विचारविनिमय होऊन विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेचे दिवंगत नगरसेवक संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात कोविड-19 प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याबद्दल या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडून तो संमत करण्यात आला, तर अन्याय-अत्याचार, गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. याशिवाय बूथ संपर्क अभियानाचा आढावा, शक्तीकेंद्र बैठकीचे नियोजन, बूथ व्हॉट्सअ‍ॅप गु्रपचा आढावा घेण्यात आला. पक्षाचा 6 एप्रिल हा स्थापना दिन साजरा करण्याचे ठरले. विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply