पनवेल : रामप्रहर वृत्त
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या 92व्या जयंतीचे औचित्य साधून स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व एमजीएम हॉस्पिटल रक्तपेढी कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 168 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संचालक आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संचालक संजय भगत, प्राचार्य डॉ. व्ही. डी. बर्हाटे, अनिल कोळी आदी उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …