Breaking News

स्मरण थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारींचे

निरूपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती. 1 मार्च 1922 रोजी जन्मलेले नानासाहेब समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य केले.

नानासाहेबांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. धर्माधिकार्‍यांच्या घराण्यात 400 वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनाव शांडिल्य असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य उर्फ शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्या काळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ’धर्माधिकारी’ अशी पदवी दिली. तेव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनाव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले.

नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले व ते अव्याहतपणे चालवले. त्यांचे चिरंजीव दत्तात्रेय व नातू सचिन यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे. त्यांचे पुत्र आप्पासाहेब यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने

स्वतःच्या शिरावर घेतली.

समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब देत गेले. या कामासाठी त्यांनी 1943 साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात आध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज सर्वत्र पसरल्या आहेत.

सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे, मात्र बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली. आध्यात्माचे धडे देतानाच नानासाहेबांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातीभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करीत नानासाहेबांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले. अशा या महापुरुषाचे 8 जुलै 2008 रोजी निवार्र्ण झाले. ते आज हयात नसले, तरी स्मृतिरूपी चिरंतन आहेत.

– नानासाहेबांना मिळालेले पुरस्कार

सन 2008मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे नानासाहेबांना मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारला. या सोहळ्याला खारघर येथे 40 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. (25-11-2008), गुजराती महाजनभूषण पुरस्कार (17-11-2000), जिल्हा परिषदेतर्फे रायगडमित्र (13 मे 1993), टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले. (18-1-2005), पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मानपत्र (12-5-2003), पुणे महापालिकेतर्फे मानपत्र पुण्याच्या महर्षी व्यास प्रतिष्ठानचा महर्षी व्यास पुरस्कार (खोपोली, 11-12-2007), महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार (1-3-2002), महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (30-4-2000), महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (29 जून 1997), रायगडभूषण राष्ट्रीय एकात्मता कार्याबद्दल सीरॉक (इंडिया) ठाणे यांचा सीरॉक इंडिया पुरस्कार (16-5-1999), शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार (31-1-2003), समर्थ व्यासपीठ पुणेतर्फे शिवसमर्थ पुरस्कार (15-11-1999), समर्थ रामदासस्वामी भूषण पुरस्कार (18-5-1999).

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply