नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
स्वदेशी बनावटीच्या असलेल्या ढीरळप18च्या कोचेसची आता अन्य देशांनाही विक्री करण्यात येणार आहे. दक्षिण आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देश या ट्रेनच्या खरेदीसाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे याबाबत एक योजना तयार करीत असून या ट्रेनच्या कोचची देशातील मागणी पूर्ण झाल्यानंतरच अन्य देशांना कोचेस तयार करून देण्यात येतील. रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. सध्या इंटिग्रल कोट फॅक्टरीमध्ये 60 हजार कोचेस तयार करण्यात आले आहेत, तसेच येत्या काळात 40 ढीरळप18 तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दक्षिण आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देशांनी ढीरळप18चे कोचेस विकत घेण्यात रस दाखवला आहे. या ट्रेनची देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यात येणार असल्याचे अग्रवाल म्हणाले. ढीरळप18 ही देशातील पहिली स्वयंचलित ट्रेन आहे. गेल्या वर्षीच ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली होती. सध्या नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान ही ट्रेन चालवण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेत रूजू होण्यापूर्वी ढीरळप18चे नाव बदलून वंदे भारत एक्स्प्रेस करण्यात आले होते.
गेल्या वर्षी आयसीएफने तीन हजार 262 कोच तयार केल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. या कोचेसच्या निर्मितीनंतर आयसीएफ जगातील सर्वात मोठी कोच निर्माण करणारी कंपनी बनली असून ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षी आम्ही चार हजार कोच तयार करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच लवकरच ढीरळप18चे अपग्रेडेड व्हर्जन ढीरळप19प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामध्ये स्लीपर कोच असतील. तसेच सध्या याच्या डिझाईन, डेव्हलपमेंट आणि निर्मितीवर काम सुरू असून याच वर्षी ती पूर्ण करण्यात येणार असल्याचेही अग्रवाल म्हणाले.