Breaking News

श्रीसदस्यांचे स्वच्छता अभियान

निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य; रेवदंडा, खालापूरमध्ये मोहीम

रेवदंडा : प्रतिनिधी

निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सदस्यांनी रविवारी (दि.1) सकाळी स्वच्छता अभियान राबवून रेवदंडा पुल ते नागाव-शास्त्रीनगर हा मुख्य रस्ता चकाचक केला. सचिन धर्माधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 3) आहे. तत्पुर्वी रविवारी सकाळी श्री सदस्यांनी हातात झाडू, फावडे, घमले, कोयता आदी साहित्य हातात घेऊन रेवदंडा पुल ते नागाव-शास्त्रीनगर रस्त्याच्या दुर्तफा असलेला केरकचरा, वाढलेली झाडी झुडपे काढून रस्ता चकाचक केला. या वेळी जमा झालेला कचरा ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या छोट्या टेम्पोतून योग्य ठिकाणी नेण्यात आला व त्याची सुयोग्य रितीने विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता अभियानात रेवदंड्यासह नागाव, थेरोडा, चौल व परिसरातील श्री सदस्य सहभागी झाले होते.

खालापूर : प्रतिनिधी

निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे रविवारी खालापूर तालुक्यातील शासकिय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 1245 श्रीसदस्यांनी सुमारे चारशे टन ओला व सुका कचरा गोळा करून त्याची योग्य पद्दतीने विल्हेवाट लावली. खालापूर तालुक्यातील श्रीसदस्यांनी रविवारी येथील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, न्यायालय, पंचायत समिती, वनविभाग कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगरपंचायत इमारत तसेच खोपोली नगर परिषद कार्यालय परिसर स्वच्छता मोहीम राबविली. श्रीसदस्यांनी अवघ्या काही तासातच या परिसरातील ओला व सुका कचरा गोळा केला. आणि तो नगरपंचायतीने नेमून दिलेल्या जागी विल्हेवाटीसाठी पाठवला. नगरपंचायतीने कचरा संकलनासाठी घंटागाडीची व्यवस्था केली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्दतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत 1245 श्रीसदस्यांसह लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारीही सहभागी झाले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply