Breaking News

कर्जतमध्ये रोजगार मेळावा

कर्जत : बातमीदार

येथील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहे. कर्जत शहरातील कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि  कॉम्पटेक कम्प्युटर यांच्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन केईएस शिक्षण संस्थेचे विश्वस्त सतीश पिंपरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कॉम्प्टेक कंप्युटर्सचे प्रमुख जितेंद्र माळी, संचालक प्रिया माळी, मुख्याध्यापिका अश्विनी साळोखे आदी उपस्थित होत्या.  आयोजक सतीश पिंपरे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विषद केला. रोजगार मेळाव्यात कर्जत तालुक्यातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी    मुंबईतील मॉडेल करिअर सेंटरचे कौन्सिलिंग प्रमुख पारुळ तिलसारा आणि प्रोजेक्ट कोऑरडिनेटर सुनिल यादव तसेच कंपनीचे एचआर उमेश जिनवाल आले होते. सुमारे 70 टक्के उमेदवार या रोजगार मेळाव्यातील मुलाखतीमध्ये यशस्वी ठरले आहेत. त्यांची ठाणे जिल्ह्यातील आघाडीचे उद्योग समूह आणि बँकांमध्ये अंतिम मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply