कर्जत : बातमीदार
नेरळ येथील गोल्डन टीमने आयोजित केलेली जैन प्रीमियर लीग (जेपीएल) बदलापूरच्या रत्नराज जैनम संघाने जिंकली. या स्पर्धेत तीन जिल्ह्यांचे विविध शहरांतील 14 संघ सहभागी झाले होते.
नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जेपीएल खेळली गेली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, मोहोपाडा, पनवेल, पाली, नागोठणे येथील संघ, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण आणि पुणे जिल्ह्यातील लोणावळा, कामशेत, तळेगाव असे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना खोपोली येथील व्हीजेएनएम व बदलापूर येथील रत्नराज जैनम यांच्यात झाला. बदलापूर संघाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवत जैनम चषक पटकावला. तिसर्या क्रमांकावर यजमान नेरळ गोल्डन टीम राहिली.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संजय जैन (नेरळ) आणि अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून कल्पेश जैन (बदलापूर) याची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज विजेश जैन, उत्कृष्ट गोलंदाज अनिकेत जैन (खोपोली), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विकास जैन (बदलापूर) ठरला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नेरळ हिंगड परिवार यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासह शंकलेश जैन, घेवरचंद जैन, विनोद हिंगड, शेषमल जैन, गणेश जैन, सोहनलाल जैन, सरेमल जैन, रमेश जैन, भवरलाल जैन आदी उपस्थित होते.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …