Breaking News

वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव

पनवेल : रामप्रहर वृत्त : वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी संपदा पालव यांचे सोमवारी (दि. 2) अभिनंदन केले.

संपदा पालव यांची वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजपचे पालीदेवद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, गुरुनाथ भोईर, युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, वांगणीच्या सरपंच सुरेखा पवार, माजी उपसरपंच संतोष शेळके, सदस्य प्रवीण म्हात्रे, संतोष पाटील, सदस्या निलाबाई कातकरी आदींनी संपदा पालव यांचे अभिनंदन केले.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply